Ad will apear here
Next
विविध हस्तकला जोपासणाऱ्या सात महिलांच्या कलावस्तूंचे प्रदर्शन
पुणे : जीवनात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये उंची गाठल्यानंतरही त्यांच्यातील अंगभूत कलागुणांनी त्यांना पुन्हा कला क्षेत्राकडे आकर्षित केले. ही गोष्ट आहे सात मैत्रिणींची. वेगवेगळ्या हस्तकलांमध्ये पारंगत असणाऱ्या पुण्यातील सात महिलांनी एकत्र येऊन ‘हँडीक्राफ्ट वंडर्स’ या नावाने आपल्या कलावस्तूंचे प्रदर्शन भरवण्याचे ठरवले आहे. पत्रकारनगर येथील दर्पण आर्ट गॅलरीमध्ये बुधवारी, ४ ऑक्टोबर ते   १० ऑक्टोबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. 

 या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कापडावर केलेली पेंटिंग्ज,  झुमका ज्वेलरी, भरतकाम (एम्ब्रॉयडरी), ‘थ्री-डी हँड एम्ब्रॉयडरी’,  स्वयंपाकासाठी लागणारी मातीची भांडी आणि शोभेच्या वस्तू, पारंपरिक व आजच्या काळातील दागिन्यांचा सुंदर मिलाफ असलेले दागिने यांसारख्या अनेकविध गोष्टींचा समावेश आहे.    
या सातपैकी एक, अश्विनी जांबोटकर या व्यावसायिक कलाकार असून त्यांनी अनेक मोठ्या कलासंस्थांबरोबर काम केले आहे. त्यांनी कापड वापरून केलेल्या फॅब्रिक कोलाज पेंटिंग्जना ग्राहकांची विशेष पसंती मिळते. ‘साकुरा हँडमेडस’ च्या माध्यमातून त्यांनी दुपट्टा, स्टोल, जॅकेट, टेबलक्लॉथ, उशांचे अभ्रे अशा फॅब्रिक पेंटिंग केलेल्या विविध वस्तू बाजारात आणल्या आहेत. विशेष म्हणजे त्या पेंटिंग करण्यासाठी पुनर्निर्मित कापडाचा वापर करतात.

श्रुती भांगडीकर यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊन भिलई स्टील उद्योगाबरोबरच नंतर पुण्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातही काम केले. रत्नशास्त्राचा एक लहान अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना ‘सेमी प्रेशिअस’ खड्यांच्या दागिन्यांमध्ये रस निर्माण झाला. चांदी आणि खड्यांचा कल्पक वापर हे त्यांनी बनवलेल्या दागिन्यांचे वैशिष्ट्य असून त्या ‘झुमका ज्वेलरी’ या संकेतस्थळावर त्या या दागिन्यांची विक्री करतात.

 मूळच्या सांगलीच्या असलेल्या वैशाली परांजपे या हाताने भरतकाम (एम्ब्रॉयडरी) करतात. इतर बारा कलाकारांसह त्या फेसबुक व व्हॉटसअपच्या माध्यमातून एम्ब्रॉयडरी केलेल्या कपड्यांचा व्यवसाय करतात. श्यामला लोणकर यांनी चित्रकलेचे व्यावसायिक शिक्षण घेतलेले असून त्याही हाताने पेंटिंग करून उशांचे अभ्रे, पिशव्या, टेबलक्लॉथ अशा वस्तू बनवतात. या प्रदर्शनात त्या थ्री-डी हँड एम्ब्रॉयडरी सादर करणार आहेत.

दीप्ती बवाणे यांनीही चित्रकलेचे व्यावसायिक शिक्षण घेतले आहे. मातीची भांडी आणि मातीच्याच इतर कलात्मक वस्तू बनवण्यात त्यांना विशेष रस आहे. रोजच्या स्वयंपाकासाठी लागणारी मातीची भांडी आणि शोभेच्या वस्तू तयार करण्यात त्यांचा हातखंडा आहे.

 मूळच्या वाणिज्य शाखेच्या असलेल्या प्राची साने या शास्त्रीय नृत्य शिकल्या आहेत शिवाय दागिने बनवणे ही त्यांची विशेष आवड आहे. त्यांनी बनवलेल्या दागिन्यांमध्ये पारंपरिक व आजच्या काळातील दागिन्यांचा सुंदर मिलाफ दिसतो. ‘एलन क्रिएशन्स’ या नावाने त्या दागिन्यांचा व्यवसाय करतात.

दीप्ती जाना याही मूळच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या आहेत, परंतु त्यांना कलावस्तूंची आवड आहे. त्यांनी छोट्या स्वरूपात काम करणाऱया कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘कलावीथी’ हे संकेतस्थळ सुरू केले असून देशातील ठिकठिकाणच्या कलाकारांनी बनवलेल्या वस्तू कोणतेही कमिशन न आकारता या संकेतस्थळावर विक्रीस उपलब्ध करून दिल्या जातात.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZNABG
Similar Posts
हस्तकलेतील नवदुर्गांद्वारे ‘नवरंग’ प्रदर्शनाचे आयोजन पुणे : वेगवेगळ्या हस्तकलांमध्ये पारंगत असणाऱ्या नऊ महिला कलाकारांनी ‘नवरंग’ या हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. पत्रकारनगर येथील दर्पण आर्ट गॅलरी येथे बुधवार, नऊ ते रविवार, १३ ऑक्टोबर दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७.३० या वेळेत सर्वांसाठी हे प्रदर्शन खुले राहणार आहे.
मसाल्यांच्या पदार्थांपासून साकारलेल्या चित्रांचे प्रदर्शन पुणे : लवंग, मिरी, दालचिनी हे मसाल्याचे पदार्थ खाद्यपदार्थांचा स्वाद वाढवण्यासाठी वापरले जातात; पण अरविंद जोशी यांनी मसाल्याच्या पदार्थांचा वापर करून चित्रे साकारली आहेत. या अनोख्या चित्रांचे ‘इंटरफ्यूजन’ हे प्रदर्शन सध्या दर्पण आर्ट गॅलरीमध्ये सुरू आहे.
‘संशोधनात महिलांचा सहभाग वाढावा’ पुणे : ‘संशोधन क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. यामुळे आता होणारे संशोधन हे शास्त्रीयदृष्टया योग्य असले, तरी ते एकांगी पद्धतीचे आहे. विविध प्रकारच्या संशोधनांमध्ये महिलांचा सहभाग वाढला तर संशोधनाचे स्वरूप बदलेल,’ असे मत जीवशास्त्र विषयातील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च’च्या (आयसर) शास्त्रज्ञ डॉ
साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम पुणे : पुण्यामध्ये येत्या रविवारी २८ जानेवारी रोजी ‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. साहसी अध्यात्मिक यात्रा परिक्रमा आणि त्यातून निर्माण झालेले साहित्य, त्यांची विक्रमी विक्री यातून सुरू झालेले विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, लोकजीवन आणि ग्रामीण शहरी जीवनशैलीचा समन्वय

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language